rajgokhale.com - Raj Gokhale

Description: Raj Gokhale, Poet, Teacher, Writer.

writer (7662) teacher (3616) poet (1428) raj gokhale (1)

Example domain paragraphs

मी आजवर माझ्या मराठी साहित्य क्षेत्रात केलेल्या लेखन, वाचन, प्रकाशन, तसेच व्याख्याने आणि व्यावसायिक क्षेत्रात, विशेषतः मार्केटिंगचे क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा हा एक संक्षिप्त संग्रह. हा संग्रह खास माझे विद्यार्थी, त्यांचे पालक , मित्रवर्य आणि इतर संबंधितांसाठी....

माझे वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्य हे अतिशय संघर्षमय राहिले आहे. तसे ते अनेकांचे असते. संघर्षमय आयुष्यात महत्वाचा असतो स्वतःवरच विश्वास आणि जीवनावरची श्रद्धा ढळू न देता मार्गक्रमण करीत राहणे. मी हेच केले. सर्वसामान्य माणसापासून ते लेखक, अभिनेते, कवी कामगार नेते, राजकारणी अशाअनेक लोकांना भेटलो. माझ्या ह्या अनुभवांचा कदाचित त्या सर्वांना फायदा होऊ शकेल जे एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी धडपडत असतात. सोबतीला माझ्या कविता, माझ्या कलाकृती , त्यातील आशय एक कलात्मक आनंद देईल

कलावंत असला तरी माणूस तो , जगण्याचा संघर्ष काही त्याला चुकलेला नाही ! कलेवर आयुष्य उधळून दिलेले आणि अखेरपर्यंत भणंग राहिलेले कलावंत मी पाहिले आणि वाचले आहेत. मला असे कधीच जगावेसे वाटले नाही...त्यामुळे व्यवहारिक आयुष्यातल्या संघर्षाला अखेरपर्यंत तोंड देणे आलेच आणि अपरिहार्यपणे त्यात जिंकणे सुद्धा ! ज्याला हा समतोल साधला तो जीवनाचा खरा कलावंत ! अर्थात हे माझे मत !